राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार सेल पुणे शहरच्यावतीने महराष्ट्र व्यापारी कट्टाचे उद्घाटन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार सेल पुणे शहरच्यावतीने महराष्ट्र व्यापारी कट्टाचे उद्घाटन

महाराष्ट्र व्यापार कट्यामुळे व्यापार वर्गाला चालना मिळेल : रुपालीताई चाकणकर

पुणे : कोरोना मुळे गेल्या सात ते आठ महिन्यापासून सर्वच क्षेत्रातील व्यापारीवर्गाला फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार सेल पुणे शहरच्यावतीने नव्याने सुरु करण्यात आलेल्या महाराष्ट्र व्यापार कट्यामुळे स्थिरावलेल्या व्यापारी वर्गास चालना मिळण्यास मदत होईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर यांनी केले.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार सेल पुणे शहरच्यावतीने महराष्ट्र व्यापारी कट्टाचे उद्घाटन सौ.रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे शहर अध्यक्ष आमदार, चेतनदादा तुपे पाटील, भोलासिंग अरोरा (अध्यक्ष उद्योग व व्यापार सेल पुणे शहर), संतोष नागरेपाटील, अमर सिंग, राकेश कामठे, राहुल टोपे, विरेंद्र किराड, सुशांत ढमढरे, शंकर सहाणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन उद्योग व व्यापार सेल पुणे शहर उपाध्यक्ष प्रियांक राजेश शाह यांनी केले असून मान्यवरांचे स्वागत ही त्यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम गोकुळ प्युअर व्हेज, शांतीनगर सोसायटी समोर, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे आज रविवार दि .10 जानेवारी रोजी दुपारी संपन्न झाला.

पुढे आपले मनोगत व्यक्त करताना रुपालीताई चाकणकर म्हणाल्या की, व्यापार वर्गाला चालना देण्यासाठी, नवीन उद्योग व्यवसायांना प्रेरणा देण्यासाठी हा व्यापार कट्टा सुरु करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार सेल पुणे ने जे नवीन संकल्प करून वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या लोकांच्या समवेत विचार घेवून चालवणार आहोत. व्यापार कट्टाच्या माध्यतामून वर्ष भर संपूर्ण महाराष्ट्रात व्यापारांच्या समस्ये बाबात कार्यक्रमाचे नियोन करण्यात येईल आणि व्यापारी वर्गाला उभारी मिळेल अशी ग्वाही चाकरणकर यांनी व्यक्त केली.

 

Leave a Reply