ए. के के न्यू लॉ अकॅडमी तर्फे अल्पसंख्यक हक्क दिन साजरा

ए. के के न्यू लॉ अकॅडमी तर्फे अल्पसंख्यक हक्क दिन साजरा

ए. के के न्यू लॉ अकॅडमी तर्फे अल्पसंख्यक हक्क दिन साजरा

अल्पसंख्यांकांच्या  हक्कांचे संरक्षण  हा घटनेचा पाया :प्रा. डॉ. एम.अफजल, वाणी

पुणे :महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या  ए. के. के.  न्यू लॉ अॅकॅडमी व पीएच.डी. रिसर्च सेंटर या विधी महाविदयालयाकडून अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात आला.  18 डिसेंबर 2020 रोजी ‘अल्पसंख्यांकांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण न्यायव्यवस्थेची भूमिका ‘ या विषयावर वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते.

वेबीनारच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  गुरु गांविंदसिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ, नवी दिल्ली  चे संचालक प्रा डॉ. एम.अफजल वाणी यांना निमंत्रित करण्यात आले होते. तर एम. सी ई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अबेदा  इनामदार, उपाध्यक्षा, एम सी ई सोसायटी या विशेष निमंत्रीत म्हणून उपस्थित होत्या ए के के न्यू लॉ अँकॅडमी प्राचार्य  डॉ. रशिद शेख यांनी प्रास्ताविक करुन मान्यवरांचे स्वागत केले. कार्यकमाचे सूत्रसंचालन मिस जेसिन्टा बॅस्टिन यांनी केले तर   उपप्राचार्य   डॉ. सलीम शेख यांनी मान्यवरांचे आभार मानले.

प्रा डॉ. एम.अफजल वाणी म्हणाले, ‘ प्रत्येक व्यक्ती ही स्थळपरत्वे अल्पसंख्यांक असतेच. त्यामुळे अल्पसंख्यांकांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण व त्या बरोबरीनेच प्रत्येक व्यक्तीच्या मानवी हक्कांचे संरक्षण हीच मुळात भारतीय राज्यघटनेचा पाया आहे. ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, मानवी हक्कांचे संरक्षण अधिक बळकटीने केले गेल्यास एकुणच सर्व समाजाची प्रगती होईल.

डॉ. पी. ए. इनामदार आपल्या भाषणात म्हणाले की, ‘अल्पसंख्यांक ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने अतिशय विस्तृतपणे उचलून घरली आहे. एका राज्यात बहुसंख्यांकांमध्ये असलेली व्यक्ती दुस-या राज्यांत भाषिक आघारावर अल्पसंख्यांक ठरते. त्यामुळे मुळात मानवी हक्कांचे संरक्षण हीच अल्पसंख्यांकांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण होण्याची गुरुकिल्ली आहे.

डॉ. पी. ए. इनामदार आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, घटनेच्या कलम 30 उपकलम 1 ने अल्पसंख्यांकांना त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षणसंस्था स्थापन करण्याचा व तिचे नियोजन करण्याचा देण्यात आलेला अधिकारच भविष्यात समाजाची अधिक बळकट बांधणी करेल.

डॉ. रशिद शेख प्राचार्य ए के के न्यू लॉ अँकॅडमी यांनी प्रास्ताविक करुन मान्यवरांचे स्वागत केले.  ते म्हणाले की अल्पसंख्यांकांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण ही आजच्या काळात अत्यावश्यक बाब आहे. म्हणूनच या अत्यंत महत्वपूर्ण विषयांशी संबंधीत असलेल्या विविध पैलुंवर चर्चा घडविणे हा या वेबीनारच्या आयोजनामागील उद्देश आहे.

एम सी ई सोसायटीच्या उपाध्याक्षा अबेदा पी इनामदार यांनी आपल्या बीजमाषणात अल्पसंख्यांकांच्या हक्कांसोबतच विशेषतः अल्पसंख्यांक महिलांच्या हक्कांच्या दृष्टने उचलावयाची पावले यावर  लक्ष वेधले.

Leave a Reply