शिवतीर्थावर ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बाळासाहेबांना जयंतीनिमित्त केले अभिवादन

शिवतीर्थावर ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बाळासाहेबांना जयंतीनिमित्त केले अभिवादन

मुंबई दि.२३ : शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शिवतीर्थ येथे जाऊन चाफ्याच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

बाळासाहेबांचा आशीर्वाद आज ही सर्व शिवसैनिकांच्या सोबत आहे. साहेब आज आमच्या सोबत आहेत आणि राहतील असे ना.डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.मा.बाळासाहेब ठाकरेंचे विचार शिवसेना पक्षप्रमुख व विद्यमान मुख्यमंत्री ना.ऊद्धवसाहेब ठाकरे पुढे नेत आहेत व बाळासाहेबांच्याच विचारावर आम्ही शिवसैनिक चालत असून भविष्यकाळात जनतेचे कामे अधिक तत्परतेने करण्यासाठी शिवसेना वचनबद्ध असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.युवा नेते व पर्यावरण तथा पर्यटन मंत्री ना.आदित्य ठाकरे वैश्विक शाश्वत विकास ऊद्दिष्टे व स्थानिक हित यांचा समन्वय घडवुन मा.बाळासाहेबांच्या स्वप्नांना भविष्य देत आहेत अ्सेही नीलम गोर्हे म्हणाल्या.
यावेळी आ.नरेंद्र दराडे आणि शिवसैनिक तसेच महाराष्ट्र विधीमंडळ उपसभापती कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply