केंद्रीय बजेट सादर करण्यात आले याबाबत ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

केंद्रीय बजेट सादर करण्यात आले याबाबत ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

केंद्रीय बजेट सादर करण्यात आले याबाबत ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची केंद्र सरकारला आणि भक्तांना विचार करायला लावणारी प्रतिक्रिया.

पुणे दि. ०१ : केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आरोग्य विषयक सुविधा यांच्यामध्ये सर्वांसाठी ह्वँक्सीन तसेच आरोग्य व पायाभूत सुविधा यांच्यावर भर देण्यात आला आहे. परंतु बँकांमधील बुडीत कर्ज आहेत याच्यामधून बँकांना संरक्षण देण्याऐवजी मोठ्याप्रमाणात राजश्रयातून बँकांचा फायदा आणि परदेशी गुंतवणूक कशी वाढेल हे पाहण्यात आले आहे. त्याचबरोबर पायाभूत सुविधा किंवा संघटित रोजगाराच्यामध्ये जे कंत्राटी कामगार व असंघटित लोक आहेत त्यांच्यासाठी जीवनाचा दर्जा बदला पाहिजे,किमान सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी किमान वेतनाचे एक पाऊल म्हंटले असले तरी त्याची अंमलबजावणी करण्यास कोणत्याच यंत्रणा जाग्यावर नाहीत. याचा परिणाम असा होतो की,अशा असंघटितांच्या डोलाऱ्यावर पायाभूत विकासाच्या सुविधा कशा उभ्या राहणार हा एक फार मोठा प्रश्न दिसत आहे.

याचबरोबर महाराष्ट्र, मुंबई यासाठी म्हणून कोणतीही विशेष योजना नाहीत या सर्व ठिकाणी पायाभूत सुविधासाठी असलेला प्रचंड ताण आहे याच्याकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. बजेटमध्ये महिला व बाल विकास विभागासाठी जे ३० हजार कोटींचे बजेट ते उलट कमी होऊन २४ हजार कोटींवर आलेले आहे. याचा अत्यंत तुटपुंजा वाटा महाराष्ट्राला मिळालेला आहे ह्या बजेटमधील खटकणाऱ्या गोष्टी आहेत. ज्या राज्यात उपद्रव मूल्य आहेत त्या राज्यांचा विचार केंद्राने केलेला आहे यात महाराष्ट्राबद्दल दुजाभाव बजेट मध्ये दिसत आहे.

आतापर्यंत ज्या शासकिय सहभागातून चांगल्या प्रकारचे कामकाज चाललेले होते अशाप्रकारेच्या सरकाराचा हिस्सा असलेले विमा, रेल्वे आणि बँक त्यांची धुळदाण करून टाकायची अशी व्युहरचना केली आहे.जसे एक
वाड्याच्या एखादा माणुस स्वतःला फार मोठा श्रीमंत पण पोकळ माणुस स्वतःच्या घराची तुळई, दारे, खिडक्या एकएक विकून टाकायला लागतो. तशा प्रकारचा हा सगळा पराक्रम केंद्र सरकारने दाखविला आहे.अशावेळी या सगळ्या पायाभूत सुविधा कुठून आणणार त्याचे पैसे कुठून आणणार यामध्ये कशा प्रकरणी खरोखर गुंतवणूक होणार या कुठल्याही गोष्टी स्पष्ट नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित असलेल्या काही लोकांचे भले करण्यापूरतेच हा सगळा शब्दांचा भुलभुलैया आहे असे स्पष्टपणाने दिसते आहे.

Leave a Reply