पराग कान्हेरे यांच्याकडून आर्थिक फसवणूक- शाम देशमुख यांची माहिती

पराग कान्हेरे यांच्याकडून आर्थिक फसवणूक- शाम देशमुख यांची माहिती

पराग कान्हेरे यांच्याकडून आर्थिक फसवणूक- शाम देशमुख यांची माहिती

पुणे : सेलिब्रिटी शेफ पराग कान्हेरे यांची आणि माझी पूर्वी ओळख होतीच. पण काही महिन्यांपूर्वी एका व्यवसायानिमित्त त्यांचा आणि माझा संबंध आला. यावेळी पराग याने मला तो आर्थिक अडचणीत असून त्यामुळे त्यामुळे घरगुती अनेक समस्या निर्माण झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी त्याने मला त्यातून बाहेर पडण्यासाठी पाच लाख रुपये हवे आहेत कृपया तू मदत केली तर मी या आर्थिक अडचणीतून बाहेर पडेल. तुझे उसने घेतलेले पैसे मी दोन महिन्यात परत करेन, अशी त्याने विंनती केली. त्यानुसार तो काहीतरी नवीन करत आहे, सध्या तो आर्थिक अडचणीत आहे, आपण मदत केली तर तो त्यातून बाहेर पडणार आहे. अन शिवाय प्रश्न दोन महिन्यांचा आहे. असा विचार करून मी सुरुवातीला एकूण चार लाख ऐंशी हजार रुपये ऑनलाईन पेमेंटद्वारे पराग याच्या बँक खात्यावर जमा केले. तसेच आमच्या व्यवसायाच्या पत्रकार परिषदेच्या दिवशी पराग याला एका देणेकऱ्याचा फोन आला असून तो मला माझे घेतलेले पैसे परत दे नाहीतर पत्रकार परिषदेत येऊन गोंधळ घालण्याची धमकी देत असल्याचे म्हटले. त्यामुळे मला अर्जंट 35 हजार रुपये उसने बँक खात्यावर ट्रान्सफर करण्याची विंनती केली. त्यानुसार मी पराग यांच्या खात्यावर 35 हजार हजार रुपये गुगल पे केले. हे सर्व पैसे दोन महिन्यात दररोज एका ठराविक रकमेने पूर्ण परत करण्याचे कायदेशीर रित्या लिहून दिले. त्यानुसार 7 नोव्हेंबर पर्यंत त्याने ठरल्याप्रमाणे मला सगळे पैसे परत करणे अपेक्षित होते. परंतु त्याने लिहून दिल्याप्रमाणे एकदाही पैसे माझ्या बँक खात्यावर जमा केलेले नाही. याबाबत त्याला एका महिन्यानंतर त्याला विचारणा केली असता त्याने मला नुसत्या तारखा सांगितल्या मात्र पैसे काही परत केलेले नाही. शेवटी आपण दोघांनी हा व्यवहार कायदेशीर लेखी केलेला असून तू जर पैसे परत करत नसशील तर मी कायदेशीर मार्गाने पुढे जाईल, असे त्याला सांगितले. त्यावेळीही त्याने काहीही प्रतिसाद न देता खुशाल कायदेशीर मार्गाने पुढे जा, असे सांगितले. त्यामुळे मी पराग कान्हेरे याला उसने दिलेले पैसे वेळेवर परत केलेले नाही. त्यामुळे माझे आर्थिक फसवणूक झालेली असून माझे आर्थिक नुकसानही झाले आहे, असे शाम देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Reply