पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी महाविकास आघाडीची पुण्यात बैठक

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी महाविकास आघाडीची पुण्यात बैठक

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि जयंत आसगांवकर यांच्या प्रचारार्थ पुणे काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीच्या नेते आणि पदाधिकारी यांची बैठक संपन्न.

पुणे दि.२०: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पुणे काँग्रेस भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. पुणे पदवीधर मतदार संघातील उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जयंत आसगावंकर यांच्या प्रचारार्थ सदरील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, सतेज पाटील, माजी मंत्री रमेश बावगे, खा. अमोल कोल्हे, खा.वंदना चव्हाण, आ.चेतन तुपे, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शहरप्रमुख संजय मोरे आदी नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपाकडे लक्ष देण्याची गरज नाही, महाविकास आघाडीचाच विजय होणार असल्याचा जयंत पाटील यांनी विश्वास व्यक्त केला.

यावेळी बैठकीत दुरदृश्य प्रणालीद्वारे बोलतांना ना.नीलम गोर्हे म्हणाल्या, २८ नोव्हेंबर ला या सरकारला एक वर्ष पुर्ण होत आहे.१ डिसेंबर ला होणार्या निवडणूकीत सर्व जागा निवडून आणणे ही या सरकारसाठी फार मोठी भेट ठरेल.या सरकारने समाजाच्या सर्व घटकांना सामावुन सक्षम करण्यास प्रयत्न केले आहेत.आज प्रबोधनकारांची पुण्यतिथी आहे ,महाराष्ट्रात प्रबोधनाच्या परंपरा विजयी व्हाव्यात यासाठी शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी,या सर्वांनी एकत्रित काम करावे .निवडणूक काळात शेवटच्या टप्प्यात स्वत: ना.जयंतराव पाटील यांनी लक्ष घालावे व मुख्यमंत्री ना.ऊद्धवजी ठाकरे तसेच मा.शरदराव पवार ,ना.बाळासाहेब थोरात, ना.अजितराव पवार, या सर्वांच्या प्रयत्नातुन निश्चितच यश मिळेल असा विश्वास डॉ. नीलम गोर्हे यांना व्यक्त केले.

Leave a Reply