वृद्ध महिलेस लक्ष करून मंगळसूत्र हिसकवणारा बिबवेवाडी पोलिसांनी केला जेरबंद

वृद्ध महिलेस लक्ष करून मंगळसूत्र हिसकवणारा बिबवेवाडी पोलिसांनी केला जेरबंद

वृद्ध महिलेस लक्ष करून मंगळसूत्र हिसकवणारा बिबवेवाडी पोलिसांनी केला जेरबंद.

पुणे: दिनांक २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता च्या सुमारास वृद्ध महिला वय वर्ष ७७ या त्यांच्या पतीसह कांचन क्लासिक अपारमेंट सर्वे नंबर ५७० महेश सोसायटी बिबवेवाडी पुणे येथे त्यांच्या मुलीस भेटण्याकरिता पायी चालत वरील पत्त्यावरील सोसायटीचे गेट मधून पायी आत मध्ये जात असताना एका कळ्या रंगाच्या दुचाकीवरून २० ते २२ वर्ष वयाचे दोन इसमांनी त्याच्यावर पाळत ठेवून त्यांचे वयोवृद्ध पणाचा फायदा घेऊन दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या इसमाने सदर वृद्ध महिलेच्या पाठीमागून पायी चालत येऊन त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले याबाबत बिबेवाडी पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

बिबेवाडी पोलीस ठाणे तपास पथक प्रभारी अधिकारी श्री राजेश उजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार अमोल शितोळे व राहुल कोठावळे यांनी घटनास्थळावरील व बिबेवाडी भागातील एकूण ३० ते ३५ सीसीटीव्ही कॅमेरा चे फुटेज प्राप्त करून सदर प्राप्त फुटेजच्या आधारे पोलीस अमलदार अमित पुजारी व तानाजी सागर त्यांनी गुप्त बातमी दारा मार्फत माहिती प्राप्त करून संशयित आरोपी विषाल अनील भांडे वय १९ वर्ष रा. बी / १९ लेन नंबर २ नीलकमल सोसायटी बिबेवाडी पुणे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास करता त्याने प्रथम पोलिसांची दिशाभूल करून तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली दरम्यान पोलिसांनी त्याच्या पोलिसी खाक्या दाखवत ताच त्याने सदर गुन्हा त्याचे फरार साथीदार सह केल्याचे कबूल केले असून त्याच्याकडून २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण ८७५०० /रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपीची फरार साथीदाराचे तपास कामी दिनांक ३ एप्रिल २०२१ रोजी पर्यंत माननीय न्यायालयाने पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण देशमुख हे करीत आहेत.

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर माननीय श्री नामदेव चव्हाण परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त मा नम्रता पाटील वानवडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राजेंद्र गलांडे बिबेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील झावरे व पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री राजेश चंद्रकांत उसगावकर यांच्यासह पोलीस अंमलदार श्याम लोहमकर अमित पुजारी. तानाजी सागर. सतीश मोरे श्रीकांत कुलकर्णी अमोल शितोळे राहुल कोठावळे अतुल महांगडे व ज्ञानेश्वर डाके यांनी केली आहे

Leave a Reply