पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे 26/11 आतंकी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण

पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे 26/11 आतंकी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण

पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे 26/11 आतंकी हल्ल्यातील शहिदांना अलंकार पोलिस स्टेशन यथे भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पुणे : पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज 26/11 आतंकी हल्ल्या मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मुर्ती दिनानिमित्त अलंकार पोलिस स्टेशन भागामधील सर्व पोलिस चौकी मधील अधिकार्‍यांना व कर्मचारी वर्गाचा आरोग्यवर्धक मध व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आले. शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आले.
सदर कार्यक्रमास वरिष्ठ पो. नि. सयाजी गवारे, आणि त्यांचे सहकारी व माजी आमदार उल्हास दादा पवार,  माजी शहर अध्यक्ष अभय दादा छाजेड, नगरसेवक अविनाश बागवे, शहर सरचिटणीस भगवान कडू, शहर युवक अध्यक्ष विशाल मलके, उपाध्यक्ष आशिष व्यवाहरे, सौरभ आमराळे, ब्लॉक अध्यक्ष प्रताप शिळीमकर, अभिजीत रोकडे, रर्वीं. राहुल लांडे, को. ब्लॉक महिला अध्यक्षा  मनिषताई करपे,  महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्राजक्ता कलमानी, वैष्णवी किराड, व ई. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक पुणे शहर युवक काँग्रेसचे महासचिव विवेक कडू म्हणाले कि ह्या भ्याड हल्ल्यात आपल्या जवळच्या व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करताना दहशतवादाविरोधात आपला लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्याचे आवाहन युवकांना त्यांनी केले.

Leave a Reply