रोटरी क्लब ऑफ पूना एअरपोर्ट, ‘डिक्काई’तर्फे महापालिकेकडे १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्त

रोटरी क्लब ऑफ पूना एअरपोर्ट, ‘डिक्काई’तर्फे महापालिकेकडे १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्त

रोटरी क्लब ऑफ पूना एअरपोर्ट, ‘डिक्काई’तर्फे महापालिकेकडे १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्त

पुणे : रोटरी क्लब ऑफ पूना एअरपोर्टतर्फे दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (डिक्काई) माध्यमातून पुणे महानगर पालिकेला १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले. पालिकेच्या आवारात महापौर मुरलीधर मोहोळ व अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांच्याकडे हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्त करण्यात आले. पाच लाख रुपये किमतीची ही दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहेत.

याप्रसंगी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेता गणेश बिडकर, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक, सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, उद्योजक दानेश शहा, रोटरी क्लब ऑफ पूना एअरपोर्टचे अध्यक्ष डॉ. ऋषिकेश दांडेकर, ‘डिक्काई’चे प्रमुख रघुनाथ येमूल गुरुजी, गुन्हे शाखेच्या अपर पोलीस अधीक्षक वैशाली माने, अवनी फाउंडेशनच्या प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे आदी उपस्थित होते.

मुरलीधर मोहोळ यांनी ‘रोटरी’च्या या मदतीबद्दल धन्यवाद दिले. ते म्हणाले, “रोटरी क्लब व येमूल गुरुजी यांच्या माध्यमातून दिलेल्या या १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पालिकेच्या अखत्यारीतील रुग्णालयांसाठी उपयोग होईल. त्यामुळे ऑक्सिजन आवश्यक असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचार सुलभ होतील. शहरातील स्वयंसेवी संस्थांकडून मिळत असलेले सहकार्य आनंददायी आहे.”

डॉ. ऋषिकेश दांडेकर म्हणाले, “या कॉन्सन्ट्रेटरमधून शुद्ध ऑक्सिजन तयार होतो. तसेच हा चोवीस तास ऑक्सिजन देऊ शकतो. या मशिन्स पोर्टेबल असून, याला रिफील करण्याची गरज नाही. वातावरणातील भविष्यात आणखी मशिन्स देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

Leave a Reply