लहान तोंडी मोठा घास घेणाऱ्या रुपाली चाकणकर यांना रिपाइं महिला आघाडी चे खुले पत्र

लहान तोंडी मोठा घास घेणाऱ्या रुपाली चाकणकर यांना रिपाइं महिला आघाडी चे खुले पत्र

 

प्रति,

रुपाली चाकणकर

टीका टीका टीका पचवायची कशी ती आठवलेसाहेबांकडून शिका.. !

रुपाली चाकणकर तुम्ही केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवलेंबद्दल आज जे वक्तव्य केले आहे ते अपुऱ्या माहितीवर केले असुन त्यातून तुमचे अज्ञान उघडे होत आहे. आपल्या पेक्षा अनुभवाने मोठ्या नेत्यांवर टीका करताना आपली वैचारिक उंची आपोआप उघडी पडते. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी रुपाली बाईंनी आठवलेसाहेबांवर टीका करण्याची घाई केली. लोकशाहीत टीका टिप्पणी करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे तसा तुम्हाला ही आहे.पण अधिकारा सोबत जबाबदारी देखील असते.

आदरणीय शरद पवार यांनी तुमच्यावर महिला आघाडी अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्या पदावरून जबाबदार वक्तव्य करीत जावा. उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला असे करू नका.
आठवलेसाहेबांनी नेहमी शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. शेतकऱ्यांचे हित बघितले म्हणूनच नरेंद्र मोदींचे सरकार दुसऱ्यांदा बहुमत घेऊन सत्तेत निवडुन आले आहे. ज्या कायद्या च्या विरोधा साठी शेतकऱ्यांच्या नावाने दिल्लीत आंदोलन सुरू आहे तो कायदा सर्वोच्च न्यायालयाने आणि केंद्र सरकार ने स्थगित केला आहे.आता त्या कायद्याची 3 वर्षे अंमलबजावणी होणार नाही.त्या आधी 3 वर्षांत लोकसभे च्या निवडणुका होणार आहेत.मग जर नवीन शेतकरी कायदे लागू होणार नसतील तर आंदोलन का असा सवाल करताना ना रामदास आठवले यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या नेत्यांबद्दल म्हंटले आहे की हे आंदोलन शेतकऱ्यांचे नसून नेत्यांचे आंदोलन आहे.आम्ही खरे शेतकऱ्यांचे हित रक्षण करणारे आहोत. हे विधान आठवले साहेबांनी रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केले. तो पर्यंत शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबई आला नव्हता .शेतकऱ्यांचा मोर्चा आज मुंबईत आला आहे. मात्र आज आठवले साहेब प्रजासत्ताक दिना चा सोहळा दुबईत साजरा करण्यासाठी दुबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील आझाद मैदान जमलेल्या शेतकऱ्यांचा आठवलेसाहेबांनी कोणत्याही प्रकारे अवमान केलेला नाही. रुपाली चाकणकर यांनी आठवलेसाहेबांसारख्या मोठ्या नेतृत्वावर टीका करताना आधी अभ्यास करावा. दुसरा विषय म्हणजे आठवलेसाहेबांना शेती माहीत नाही असा आरोप रुपालीबाईंनी केला आहे. या आरोपातून त्यांचे अज्ञान उघडे पडते. खरे तर आठवलेसाहेब हे शेतमजूर आईच्या पोटी जन्मलेले सांगली चे भूमिपुत्र आहेत. सांगली जिल्ह्यातील गावात त्यांचे बालपण गेले आहे.गाव आणि शेती माहिती असलेला नेता; गरिबांचा मसिहा;संघर्षनायक नेतृत्व रामदास आठवले आहेत.

अनेक विषयात मुद्दा असताना आम्ही कोणीही कधीही आदरणीय शरद पवार साहेबांबद्दल वाईट बोलत नाही.आठवलेसाहेबांची आम्हाला तशी शिकवण आहे.पण तुम्हाला अर्धवट महितीवर मोठ्या नेत्यांवर टीका करण्याची शिकवण शरद पवारसाहेब देऊ शकत नाहीत. असा अर्धवट माहितीतुन आरोपबाजी तुम्ही कुठे शिकलात? रुपाली  तुमचे बोलणं ऐकून झोप आली! मोठया नेत्यांवर चुकीची टीका करणे तुमची चूक झाली.. एकदा नाही दोनदा झाली.!

संगीता आठवले

(अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) )

Leave a Reply