श्री साई योगी सेवा प्रतिष्ठानच्या  वतीने पोस्टमन काकांना भाऊबीज भेट

श्री साई योगी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पोस्टमन काकांना भाऊबीज भेट

पोस्टमन काकांना भाऊबीज भेट

श्री साई योगी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रभाग क्रमांक 28 मधील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड पोस्ट ऑफिसमधील पोस्टमेन काका यांना भाऊबीज भेट म्हणून दिवाळी फराळ साहित्य असलेले शिधा किट, सँनिटायझर व मास्क भेट देऊन योगिता सुराणा, अनुसया गायकवाड, हलिमा शेख यांनी औक्षण करुन भाऊबीज साजरी केली.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत सुराणा म्हणाले कि, ‘कोरोनाच्या प्रादुर्भाव तीव्र असतांनाच्या काळात स्वतःच्या जिवाशी पर्वा न करता आलेले पत्र घरोघरी जाऊन देण्याचे काम त्यांनी अगदी चोखपणे बजावले. दिवाळीच्या काळात पोस्टमन काका यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडलेला असतो. त्यांच्याही घरात आरोग्याची काळजी घेत दिवाळी साजरी व्हावी ह्याकरिता श्री साई योगी सेवा  प्रतिष्ठान कडून त्यांना आम्ही छोटीशी भेट दिली.’

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अँड. अभयजी छाजेड, राजेंद्र बाटीया, मोहन बागमार, रमेश जाधव व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री साई योगी सेवा प्रतिठानचे अध्यक्ष भरत सुराणा व योगिता सुराणा यांनी केले होते. तसेच कार्यक्रमाचे नियोजन दिपक शेलकर, परमेश्वर हुसगे सर, हेमाशू सुराणा यांनी केले.

Leave a Reply