महाराष्ट्रात यशस्वी उद्योजक घडवणे हाच आमचा ध्यास- अमोल इचगे

महाराष्ट्रात यशस्वी उद्योजक घडवणे हाच आमचा ध्यास- अमोल इचगे

पुणे, दि.०८ जानेवारी २०२१: ‘मराठी पाऊल पडतय पुढे’, या उक्तीला वास्तव स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी युवा उद्योजक अमोल इचगे यांनी साईबा अमृततुल्य व नाश्ता घर या प्रसिद्ध ब्रॅण्डच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नव युवक युवतींना व्यवसायाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात साडेतीनशे हून अधिक शाखे नंतर पुण्यात वडगाव,आंबेगाव येथील शाखेचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात आज करण्यात आले.

नविन वर्षांची भेट म्हणून सिंहगड कॉलेज परिसरातील खवय्यांसाठी साईबा अमृततुल्य व नाश्ता घरच्या माध्यमातून विनोद शिरतोडे व राजेश महारनूर यांनी समोसा, वडा, मिसळ, पोहा, उपिट, साबू वडा, शित पेय अादी अनेक चविष्ट पदार्थांचा आस्वाद या नाष्टा घर मध्ये उपलब्ध करून दिला आहे.

आज पुण्यातील वडगाव, आंबेगाव, सिंहगड कॉलेज मेनगेट येथील शाखेच्या भव्य उद्घाटनप्रसंगी साईबा अमृततुल्य व नाश्ता घर चे संचालक उद्योजक अमोल इचगे, माजी नगरसेवक विकास नाना, शाखा प्रमुख विनोद शिरतोडे व राजेश महारनूर, परिवारातील सदस्य, नातेवाईक, मित्र मंडळी, हितचिंतक, परिसरातील नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply