मिळकतकर वाढीला शिवसेनेचा विरोध 

मिळकतकर वाढीला शिवसेनेचा विरोध 

 पुुणे: महापालिकेच्या मिळकतकरामध्ये सन 2021- 22 या आर्थिक वर्षासाठी 11 टक्के करवाढीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला आहे. त्यातुन पालिकेच्या उत्पन्नात 130 कोटींची वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरीकांची आथीेक घडी विस्कटली आहेत. त्याच प्रामाणिकपणे नियमित  कर भरणाऱ्या नागरिकांवर करवाढीचा भुर्दंड लादणे चुकीचे आहे.  या करवाढीला शिवसेनेचा विरोध आहे.

पालिकेच्या मिळकतकराची वर्षानुवर्षे थकबाकी ठेवणाऱ्यांसाठी ७५% सूट देणारी अभय योजना राबवत आहे. गेल्या ३ महिन्यांत ५० लाखापर्यंत थकबाकी असणार्या थकबाकीदारांना जवळपास १७५ कोटी रुपयांची सूट देऊन महापालिकेने ३७० कोटी रुपये थकीत कर मिळवला आहे. प्रामाणिकपणे कर भरणार्यांना दरवाढीची शिक्षा,  कर बुडव्यांना अभय योजना  अशी सत्ताधारी भाजपची भूमिका दिसत आहे. पुणेकरांनी सत्ताधारी भाजपवर प्रामाणिकपणे विश्वास दाखवून एकहाती सत्ता दिली असून या भुमिकेमुळे त्यास तडा गेला असल्याची टिका शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली आहे.

मिळकतींवर कर आकारणी न झालेल्या हजारो मिळकती  शोधल्यास पालिकेच्या  उत्पन्नात वाढ होणार  आहे. १ कोटीच्या वर महापालिकेच्या मिळकतकराची थकबाकी असणार्या ४७४ थकबाकीदारांकडील १ हजार २१८ कोटी रुपये थकबाकीवसुली साठी  प्रयत्नच होताना दिसत नाहीत. याशिवाय पाणीपट्टीची जवळपास ४०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. हजारो कोटी रुपयांची मिळकत कर थकबाकी वसुली करायची सोडून प्रामाणिकपणे नियमित कर भरणाऱ्या नागरिकांवर कर वाढीचा भुर्दंड लादून जेमतेम १३० कोटी रुपयांचा महसूल जमा करणे चुकीचे आहे.  सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर स्थायीच्या खास सभेत हा प्रस्ताव मंजूर केल्यास शिवसेनेला रस्त्यावर उतरून आंदोलन करावा लागेल असा इशारा शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिला आहे.

 

Leave a Reply