सकल ओबीसी समाज तर्फे नायगाव येथील सावित्रीआईच्या स्मारकाला अभिवादन

सकल ओबीसी समाज तर्फे नायगाव येथील सावित्रीआईच्या स्मारकाला अभिवादन

नायगाव: ३ जानेवारी, सावित्रीआई यांच्या जयंती दिवशी सकल ओबीसी समाज तर्फे नायगाव येथील सावित्रीआईच्या स्मारकाला अभिवादन करून स्वरा नानासाहेब गारडे या सावित्रीच्या लेकीचा ही जन्मदिवस साजरा करणेत आला. व सकल ओबीसी समाज दिनदर्शिकांचे वाटप देखील करण्यात आले. सावित्री आई यांचे चौथे वंशज मारुती गणपत नेवसे यांनी सकल ओबीसी समाजाच्या सर्व पदाधिकार्यांचे स्वागत केले.

या वेळी बोलताना सकल ओबीसी समाज समन्वयक नितीन बोराटे यांनी फुले दाम्पत्याना भारतरत्न देण्याची व भिडे वाडा स्मारक करण्याची मागणी केली तसेच सर्व बहुजन समाजातील ज्या मुलींची जन्मतारीख 3 जानेवारी आहे त्यांनी नायगाव येथील सावित्री आईच्या जन्म ठिकाणी आपला वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन देखील केले.

या प्रसंगी सलून पार्लर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सोमनाथ काशीद यांनीही फुले दाम्पत्य यांना नोबेल पुरस्कार देण्याची मागणी व्यक्त केली.
या अभिवादन व जन्मदिन सोहळ्या प्रसंगी नानासाहेब गारडे, नितीन बोराटे, मिसेस बोराटे, सोमनाथ काशीद, स्वरा व तीची आई व बहीण उपस्थित होते.

Leave a Reply