‘स्पर्धा स्वत:शीच करा, तरच लांबचा पल्ला गाठालं’, सावनी रविंद्र

‘स्पर्धा स्वत:शीच करा, तरच लांबचा पल्ला गाठालं’, सावनी रविंद्र

‘स्पर्धा स्वत:शीच करा, तरच लांबचा पल्ला गाठालं’, सावनी रविंद्र

सुमधूर गळ्याची गायिका ‘सावनी रविंद्र’ विविध भाषेतील गाण्यांमुळे सुप्रसिद्ध आहे. लॉकडाऊन नंतर ती प्रथमच ‘सोनी मराठी’वरील ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमात सहभागी झाली होती. नुकताच त्या कार्यक्रमाचा ग्रॅंड फिनाले सोहळा पार पडला. त्यात अभिनेता ‘आस्ताद काळे’ याने उपविजेते पद पटकावलं.  त्याची मेंटॉर गायिका ‘सावनी रविंद्र’ ही होती.

गायिका ‘सावनी’ने ह्या आधी अनेक रिअॅलिटी शोज केलेत त्याविषयी ती सांगते, “मी 2011 मध्ये ‘झी मराठी’वरील ‘सारेगमप’ ह्या रिएलिटी शोमध्ये कंटेस्टंट होते. तेव्हा मी फायनल पर्यंत पोहोचून उपविजेती ठरले होते. त्यानंतर गेल्यावर्षी मी ‘झी युवा’वरील ‘संगित सम्राट’ ह्या कार्यक्रमात मेंटॉर होते. आणि आता ‘सोनी मराठी’वरील ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमातही मेंटॉर म्हणून होते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात एक कंटेस्टंट ते एक मेंटॉरचा प्रवास हा खूप काही शिकवून जाणारा होता.”

पुढे ती सिंगिंग स्टार कार्यक्रमात उपविजेती ठरली त्या अनुभवाविषयी सांगते,“ उपविजेतेपद मिळाल्यानंतर मला अत्यंत आनंद झाला. त्या मंचावरील संपूर्ण प्रवास क्षणार्धात माझ्या डोळ्यांसमोरून गेला. मेंटॉरची भूमिका ही अत्यंत जबाबदारीची  होती. शिवाय अभिनेता आस्ताद काळे याने शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे मला त्याच्याशी जुळवून घेणं थोडं सोप्पं गेलं. शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतल्यामुळे शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गाणं त्याला त्यामानाने सोप्प जाणारं होतं. परंतु विविध प्रकारची गाणी त्याने स्पर्धेत गावी आणि स्वत:ला सिद्ध करावं. अशी माझी इच्छा होती.  त्यामुळे मी आस्तादकडून सर्वात आधी विविध धाटणीची गाणी गाऊन घेतली, आणि त्यानंतर थेट फिनालेला त्याच्याकडून क्लासिकल गाण्याची प्रॅक्टिस करून घेतली.”

पुढे ती म्हणते, “प्रत्येक भागात सर्व गाणी आम्ही तितक्याच एनर्जीने सादर केली. शिवाय एक मेंटॉर म्हणून मी आस्तादला सांगितले होते, “आपली स्पर्धा ही इतरांशी न करता स्वत:शीच करू. तरच आपण लांबचा पल्ला गाठू.” आणि त्यानेही मला संपूर्ण कार्यक्रमात उत्तम साथ दिली.”

Leave a Reply