खा. शरदचंद्रजी पवार ह्यांच्या भव्य भित्तिचित्राचे मा.जयंत पाटील ह्यांच्या हस्ते अनावरण

खा. शरदचंद्रजी पवार ह्यांच्या भव्य भित्तिचित्राचे मा.जयंत पाटील ह्यांच्या हस्ते अनावरण

मा.खा. शरदचंद्रजी पवार ह्यांच्या भव्य भित्तिचित्राचे मा.जयंत पाटील ह्यांच्या हस्ते अनावरण

पुणे: महाविकास आघाडीच्या वतीने मा.खा.शरदचंद्रजी पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसा निमित्त मा.उपमहापौर दीपकभाऊ मानकर ह्यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल्या ६० फुट बाय ३० फुट अशा भव्य भित्तिचित्राचे उद्घाटन जलसंपदामंत्री जयंत पाटील(राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष)यांच्या शुभहस्तेरमणबाग चौक येथे करण्यात आले.चित्रकार नीलेश खराडे आहेत.ह्या कार्यक्रम प्रसंगी मा.उपमहापौर दीपकभाऊ मानकर,आ.संजयमामा शिंदे(करमाळा),आमदार चेतन दादा तुपे (राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष पुणे),अंकुश काकडे(प्रवक्ता),संजय मोरे(शिवसेना शहराध्यक्ष पुणे),रमेश दादा बागवे(कॉंग्रेस शहराध्यक्ष पुणे),बाळासाहेब दाभेकर,दत्ता भाऊ सागरे(माजी विरोधी पक्ष नेता ) आदि मान्यवरांसोबत महाविकास आघाडी चे पदाधिकारी,कार्यकर्ते,व नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.ह्या प्रसंगी बोलताना मा.जयंत पाटील ह्यांनी मा.शरदचंद्रजी पवार ह्यांच्यापासून आजपर्यंत अनेक जणांनी प्रेरणा घेतली असून हयापुढील काळातही त्यांच्यापासून प्रेरणा मिळत राहील असे प्रतिपादन केले॰

छायाचित्र :जयंत पाटील दीपक भाऊ मानकर व अन्य मान्यवर

Leave a Reply