शिवछत्रपती समाजयोद्धा गौरव पुरस्काराचे वितरण

शिवछत्रपती समाजयोद्धा गौरव पुरस्काराचे वितरण

पुणे: सुसंस्कृत विद्येचे माहेरघर असणार्या सांस्कृतिक पिंपरी चिंचवड शहरांत शिवजयंती निमित्त साधून संस्कृती विद्या कला प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड यांच्या कडून विविध क्षेत्रातील अतुलनीय कार्यासाठी विविध नामवंताना शिवछत्रपती राज्यस्तरीय समाजयोद्धा पुरस्कार 2021 देऊन सत्कार करण्यात आला आहे .

पिंपरी चिंचवड या सांस्कृतिक सुसंस्कृत शहरांत शिवछत्रपती राज्यस्तरीय समाजयोदधा पुरस्काराचे
सर्व गौरव सोहळा व सत्कार समारंभ यांचे गौरव पुर्ण नियोजन प्रा.अमोल चिंचकर संस्थापक अध्यक्ष संस्कृती विद्या कला प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड यांच्या मार्फत करण्यात आले.
रविवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी प्रा.रामकृष्ण मोरे नाट्यगृह चिंचवड येथे हा सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार वितरण गौरवपूर्ण उल्लेखनिय सोहळ्यात माजी राज्यसभा खासदार श्री अमरजी साबळे, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक जेल प्रमुख यु.टी.पवार यांच्या हस्ते कोरोनाच्या काळातील आणि सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय कार्यासाठी प्रा.मनोहर भोसले ( शैक्षणिक),प्रा. डाॅक्टर राजेंद्र खेडेकर (वैद्यकीय),विमाअधिकारी श्री. संतोष रोकडे(माजी सैनिक), रामचंद्र आडेपवार (यशस्वी उद्योजक) राहुल चोप्रा (यशस्वी उद्योजक), महालिंग चिंचकर (आदर्श पालक) , यांना शिवछत्रपती राज्यस्तरीय समाजयोद्धा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

पिंपरी चिंचवड शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील नावलौकिक या पुरस्कार वितरण गौरवपूर्ण सोहळ्यात पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर सौ.माई ढोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. संदिप जोरे, दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक  नंंदकुमार जाधव, रक्ताचे नाते ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राम बांगड , नाट्य निर्माते विजय जोशी, अभिनेञी स्वाती हनुमनघर , बालअभिनेञी हर्षदा बांदल , माॅडेल अभिनेञी पुजा रेड्डी, माजी सैनिक भक्त राज मुंडे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे , उद्योजक सुहास हिंगणे हे सर्व मान्यवर उपस्थित होते.

सदरप्रसंगी प्रा.वसंत कानेटकर लिखित “रायगडाला जेंव्हा जाग येते” या ऐतिहासिक अजरामर नाट्यप्रयोग सादर करण्यात आला आहे. या सर्व गौरव पुर्ण सोहळ्याचे आयोजन प्रा.अमोल चिंचकर ,संस्कृती विद्या कला प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड यांच्या कडून करण्यात आले, या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाट्य निर्माते श्री.. विजय जोशी यांनी केले तर या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आभार प्रा.मनोहर भोसले यांनी केले.
तेंव्हा संस्कृती विद्या कला प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड संस्थापक अध्यक्ष प्रा. अमोल चिंचकर यांना सांस्कृतिक क्षेत्रातील पुढील कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा हार्दिक अभिनंदन.

Leave a Reply