जनहित विकास मंच च्या वतीने दत्तनगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

जनहित विकास मंच च्या वतीने दत्तनगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

 

जनहित विकास मंच च्या वतीने दत्तनगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन


दत्तनगर, पुणे ता २० : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि राज्याचे आरोग्य मंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, कोरोना काळातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी, दत्तनगर प्रभाग क्र -४० व जनहित विकास मंच च्या वतीने आज जांभूळवाडी रोड येथील कै.रखमाबाई तुकाराम थोरवे  प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व रक्तदाते, व परिसरातील नागरिकांचे राष्ट्रवादी पक्षाकडून आभार व्यक्त करण्यात आले. ब्लड बँकेच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर संपन्न झाले. यामध्ये 100 हून अधिक पिशवी रक्त संकलन करण्यात आले.

यावेळी बोलताना स्मिताताई कोंढरे म्हणाल्या, कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे.

या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी, दीपाली धुमाळ (विरोधी पक्षनेत्या पुणे म.न.पा.), स्मिता कोंढरे (नगरसेविका प्रभाग क्र.४०), सुधीर कोंढरे (जनहित विकास मंच) यांच्यासह परिसरातील रक्तदाते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

होते.

 

 

 

Leave a Reply