StarGlazze फिल्म & टेलिव्हिजन अकॅडेमीला पुण्यात सुरूवात

StarGlazze फिल्म & टेलिव्हिजन अकॅडेमीला पुण्यात सुरूवात

पुणे: स्टारग्लेज फिल्म ॲंड टेलिव्हिजन अकॅडेमी या चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांविषयीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे आज गुरूवर दिनांक २८ जानेवारी रोजी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते व अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज मेघराज राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ही संस्था बालगंधर्व रंगमंदिर शिवाजीनगर पुणे पासून जवळ अंतरावर सुरू करण्यात आली आहे.

StarGlazze फिल्म & टेलिव्हिजन अकॅडेमी चे संचालक अभिजीत भारद्वाज व पूजा जालांदर यांनी अकॅडेमीत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Acting, Modeling, Cinematography, Flim Direction, Flim making, Photography, Digital video editing, Sound engineering आदी अनेक कोर्सेस सोबतच Event management, Pageant show, Production या विषेश सेवा देखील StarGlazze च्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत.

आजच्या या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, भाजप युवा मोर्चा, मुंबईचे रुपेश सावरकर, तसेच अनेक कलाकार, नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

StarGlazze फिल्म & टेलिव्हिजन अकॅडेमी मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आपल्या आवडीचा कोर्स निवडून आजच सिट बूक करा. अकॅडेमीच्या अधिक माहितीसाठी Starglazze.com या वेबसाईटला भेट द्या.

Leave a Reply