दलित पँथरचे युवक प्रदेशाध्यक्ष शुभम भैय्या सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
मुंबई: गोरगरीब, दलित वंचित समाजातील नागरिकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून दलित पँथर या राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून युवक अध्यक्ष म्हणून शुभम भैय्या सोनवणे राज्यभर काम करत होते. या सर्व कामांची दखल घेत व शुभम सोनवणे यांच्या पाठिशी उभा असलेला समाज व कार्यकर्त्यांची फळी पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस भवन मुंबई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव तात्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते शुभम सोनवणे यांचे पक्षात स्वागत करण्यात आले, तर प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या सत्कार केला. या सोहळ्याप्रसंगी दलित पँथर्सचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव तात्या सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस गरजे, दलित पँथरचे रवि वाल्मिकी, विकास भोसले, प्रकास साळवे, राजेंद्र गायगवळी, कामगार आघाडीचे योगेश जाधव, बावसकर जुम्बर, सुरूज तुपे, संतोष सोनवणे, सरपंच चेतेन दरेकर, विजय शिंदे, रोहीत सोनवणे आदि पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी दलित पँथर्सचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव तात्या सोनवणे म्हणाले पवार साहेबांच काम हे गरिब, शेतकरी, दलित, महिला, युवावर्ग व शोषितांच्या न्यायासाठी होते आणि आहे. चळवळीत काम करत असतांना अनेकदा साहेबांना भेटण्याचा योग आले त्यामुळे आम्हाला त्यांचा व त्यांच्या कामाचा अभिमान आहे. यासोबतच त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे देखील कौतुक केले. प्रवेशा नंतर शुभम सोनवणे यांनी अजितदादा पवार, जयंत पाटील, सुखदेव तात्या व सर्व युवा कार्यकर्त्यांचे आभार मानले.