लायन्स क्लब्ज ऑफ पुणे ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी प्रतिष्ठानतर्फे मोफत मधुमेह तपासणी व जनजागृती

लायन्स क्लब्ज ऑफ पुणे ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी प्रतिष्ठानतर्फे मोफत मधुमेह तपासणी व जनजागृती

लायन्स क्लब्ज ऑफ पुणे ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी प्रतिष्ठानतर्फे
शनिवारी मोफत मधुमेह तपासणी व जनजागृती कार्यक्रम

तिसरा लायन्स समाजरत्न पुरस्कार ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना जाहीर


पुणे : लायन्स क्लब ऑफ पुणे ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी प्रतिष्ठान व लायन्स फ्रेंड्स यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मधुमेह दिनानिमित्त मोफत मधुमेह तपासणी व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (दि. ५ डिसेंबर २०२०) बावधन येथील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या बन्सीरत्न सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती लायन्स क्लब्जचे माजी प्रांतपाल व मधुमेह जनजागृती कार्यक्रमाचे संयोजक लायन चंद्रहास शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी लायन श्याम खंडेलवाल, लायन सतीश राजहंस, आर के शहा, ज्योतीकुमार अगरवाल, प्रकाश नारके आदि पदाधिकारी उपस्थित होते.

लायन चंद्रहास शेट्टी म्हणाले, “मधुमेहाबाबत जनजागृती करण्यासाठी गेली १७ वर्षे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. जनजागृती रॅली, मधुमेह व अवयवदान या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पुरस्कार अशा विविध कार्यक्रमांचा यात समावेश असतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅली निघणार नाही. मधुमेह तज्ज्ञ डॉ. अश्विनी जोशी यांचे व्याख्यान होणार आहे. इन्शुलिन विषयी समज-गैरसमज, मधुमेहा बाबत घ्यायची काळजी, लहान मुलांमधील मधुमेहाची कारणे व दक्षता, मधुमेहींसाठी आहार, अवयवदान जागृती व तणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी त्या मार्गदर्शन करतील. दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत मधुमेहासंबंधी तपासण्या पूर्णतः मोफत करण्यात येणार आहेत.”

“तपासणी आणि व्याख्यानानंतर संस्थेच्या वतीने दिला जाणारा तिसरा लायन्स समाजरत्न पुरस्कार यंदा सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, महापौर मुरलीधर मोहोळ, राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, माजी पोलीस अधिकारी विठ्ठल जाधव, वरिष्ठ पत्रकार सम्राट फडणीस, प्रांतपाल अभय शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम https://www.facebook.com/SuryadattaGroupofInstitutes वर सर्वाना विनामूल्य लाईव्ह पाहता येणार आहे,” असेही शेट्टी यांनी सांगितले.

Leave a Reply