स्वाती हनमघर यांच्या स्वेव स्पालॉनच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन

स्वाती हनमघर यांच्या स्वेव स्पालॉनच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन

स्वाती हनमघर यांच्या स्वेव स्पालॉनच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन­

एका क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असतात. तुमची ज्ञानेंद्रिय सजग असतील तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात नवी छाप सोडू शकतात. यावर विश्वास ठेवून सौंदर्य क्षेत्रात गेल्या दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत असलेल्या स्वाती हनमघर यांनी स्पालॉन सुरू करण्याचे ठरवले आहे. स्पा, सलॉन, ब्युटी स्टुडिओ आणि अकॅडमी यांचे एकत्रीकरण असलेली ही स्पालॉन संकल्पना आहे. एकाच ठिकाणी अनेक सोयी उपलब्ध करून देणे, तसेच मानसिक आरोग्य आणि सौंदर्य यांची सांगड घालून ग्राहकांना उत्तम सुविधा देणे या स्पालॉनचे विशेष आकर्षण आहे. ही संकल्पना यूनिसेक्स (स्त्री आणि पुरुष दोघांकरिता) असून नवीन असल्यामुळे ग्राहकांना नक्कीच आकर्षित करेल अशी खात्री स्पालॉनच्या सर्वेसर्वा स्वाती हनमघर यांनी दिली.

 

नवोदित संकल्पनेतून साकारलेल्या या स्वेव स्पालॉनचा उद्घाटन समारंभ २८ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे. स्पालॉनची पहिली शाखा सिंहगड रस्ता येथील माणिकबाग येथे सुरू करणार आहे. बुधवारी पत्रकार संघात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अंकिता हनमघर, स्वाती हनमघर उपस्थित होते.

 

स्वेव स्पालॉनविषयी बोलताना स्वाती म्हणाल्या, या स्पालॉनच्या माध्यमातून खाजगी प्रशिक्षण तर देण्यात येईल. तसेच गरजू आणि ग्रामीण मुलामुलींना सौंदर्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय सदस्यत्व, पॅकेजेस, व्हाउचर, आकर्षक ऑफर्सही असणार आहे. तसेच भविष्यात विविध ठिकाणी स्पालॉनच्या शाखा काढणार असून फ्रांचाईजी उपलब्ध करून देणार आहोत.

स्वाती म्हणाल्या, या क्षेत्रात प्रवेश केल्यापासून काहीतरी वेगळे करण्याचे स्वप्न मी पाहत होते. सौंदर्य क्षेत्रातील अनुभव, अवॉर्ड्स यामुळे स्पालॉनच्या संकल्पनेकडे मी अधिक आत्मविश्वासाने पाहू लागले. हे स्वप्न साकारताना एक वेगळाच आनंद होत आहे. कारण इथपर्यंतचा प्रवास जास्त खडतर होता. आताच्या घडीला स्वतंत्र स्त्री म्हणून आयुष्याकडे बघणे खूप महत्त्वाचे आहे. तुमचं काम तुम्हाला प्रतिष्ठा आणि आदर देते. त्यामुळे कामातून स्वतःला सिद्ध करा आणि स्वतःची ओळख मिळवण्यासाठी तुमच्या छंदाचे रूपांतर व्यवसायात करा.

Leave a Reply