“द मोमो हाऊस” आता पुणे शहरात दाखल

“द मोमो हाऊस” आता पुणे शहरात दाखल

महाराष्ट्रात “द मोमो हाऊस”ची १२ रेस्टोरंट्स असून या राज्यात त्यांची वेगवान आगेकूच सुरु आहे.

दक्षिण आणि उत्तरेकडील शहरांमध्ये देखील सुरु करणार रेस्टोरंट्स गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्रात येणार नवीन रेस्टोरंट्स

पुणे: क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्सची मुंबई-स्थित शृंखला, चटकदार, चविष्ट मोमोज् साठी प्रसिद्ध “द मोमो हाऊस” ने पश्चिम भारतामध्ये महत्त्वाकांक्षी व्यवसाय विस्ताराची योजना आखली आहे. मुंबई आणि नाशिकमध्ये या कंपनीने आधीच आपली १२ रेस्टॉरंट्स सुरु केली असून महाराष्ट्र आणि गुजरातेतील इतर शहरांमध्ये त्यांची नवीन आउटलेट्स येत आहेत.

पुणे शहरात आपल्या पहिल्या रेस्टॉरंटच्या उद्घाटनाच्या दिवशी “द मोमो हाऊस” चे संस्थापक आणि सीईओ श्री. वरूण कपूर यांनी शहरामध्ये १० रेस्टॉरंट्स सुरु करण्याची योजना असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, “पुण्यामध्ये बाहेरच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची आणि रेस्टॉरंट्समध्ये जाऊन मजेत वेळ घालवण्याची पद्धत लोकप्रिय आहे. शहराच्या या स्वभावाला प्रोत्साहन देण्यात द मोमो हाऊस खूप मोठी भूमिका बजावेल. पुणे शहरात कोथरूडमध्ये सुरु करण्यात येत असलेल्या आमच्या पहिल्या रेस्टॉरंटमध्ये एकावेळी तब्बल ४० व्यक्ती आरामशीर बसून मोमोजचा आस्वाद घेऊ शकतात. पुण्यातील चोखंदळ खवय्यांच्या आवडीनिवडी डोळ्यासमोर ठेऊन आम्ही या रेस्टॉरंटची रचना केली आहे. चविष्ट खाणे मिळाले पाहिजे आणि वेळ छान घालवता यावा या पुणेकरांच्या मागण्या आम्ही याठिकाणी पूर्ण करणार आहोत. आमच्या खास तयार करण्यात आलेल्या मेन्यूमध्ये मोमोचे ४५ पेक्षा जास्त प्रकार, ८ प्रीमियम डिमसम्स असा कोणत्याही पंचतारांकित रेस्टॉरंटला साजेसा मेन्यू असून, त्यासोबत डोनट बावज् व बेवरेजेस देखील असतील.”

पुढे ते म्हणाले, “पश्चिम भारतात महाराष्ट्र ही आमच्यासाठी वेगाने विकसित होत असलेली बाजारपेठ आहे. याठिकाणच्या आमच्या ग्राहकांकडून आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, ‘द मोमो हाऊस’ ची चव, मेन्यूतील वैविध्य आणि पदार्थांचा दर्जा या सर्वांना ग्राहकांची खूप पसंती मिळत आहे. आमची लोकप्रियता वेगाने वाढत असून फ्रँचायझीसाठी भारतभरातून विचारणा केली जात आहे. बंगलोर, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली, चंदिगढ, कोलकाता या शहरांमधून सातत्याने चौकशी केली जात आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ग्राहकांनी आमच्या रेस्टॉरंट्समध्ये येऊन पदार्थांचा आस्वाद घेतला त्यांनी देखील फ्रँचायझी सुरु करण्यासाठी चौकशी केली. पुढील दोन वर्षात ५० आउटलेट्स सुरु करण्याची ‘द मोमो हाऊस’ची योजना आहे.”

अस्सल चवींचे आणि नवनवीन प्रकारचे मोमोज् तयार करण्यात ‘द मोमो हाऊस’चा हातखंडा आहे. अस्सल दार्जिलिंग व्हेज, चिकन आणि पनीर मोमो तर इथे आहेतच शिवाय स्टीम्ड, फ्राईड, पॅन फ्राईड, स्टर फ्राईड, तंदुरी असे नानाविध प्रकारचे मोमोज् याठिकाणी आहेत. थुपका मोमो सूप, सिझलर प्लॅटर मोमो, चीज बॉम्ब आणि चिकन चीज हे त्यांचे स्पेशालिटी मोमोज् आहेत. भारतीय चवींचे, भारतीय ग्राहकांना विशेष आवडणारे पनीर अचारी आणि चिकन पेरी पेरी असे प्रकार देखील त्यांनी अतिशय आवडीने तयार केले आहेत.

‘द मोमो हाऊस’च्या मेन्यूमध्ये जगभरातील सर्वाधिक अस्सल चवींचे चविष्ट डिमसम्स आहेत. यामध्ये रिकोटा स्पिनच विथ बर्न्ट गार्लिक, वॉटर चेस्टनट आणि मश्रुम विथ सेलरी यासारख्या प्रकारांचा समावेश आहे.

Leave a Reply