शिक्षण खात्यावर बजेट मध्ये किमान ६% खर्च व्हावा- उमेदवार बाळासाहेब गोतरणे

शिक्षण खात्यावर बजेट मध्ये किमान ६% खर्च व्हावा- उमेदवार बाळासाहेब गोतरणे

शिक्षण खात्यावर बजेट मध्ये किमान ६% खर्च व्हावा यावर प्रयत्न करणार : उमेदवार बाळासाहेब गोतरणे

पुणे : विधान परिषद पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाउंडेशन व शिक्षक संघटना बच्छाव आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब गोतरणे निवडणूक रिंगणात उभे आहेत. शिक्षण क्षेत्रात गेल्या 28 वर्ष शिक्षकांची संबंधित गहन प्रश्न सोडवण्यासाठी अनेक आंदोलने व चळवळीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी 30 पेक्षा अधिक वेळा आंदोलने करून ती यशस्वी केली.

सध्याचे शिक्षण हे सर्व स्तरावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या दृष्टीनं साशंक बनला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळुणकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे, कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे, डॉक्टर पंजाबराव देशमुख आदी महात्म्यांनी बहुजनांसाठी व दीनदलितांसाठी शिक्षणाची दारे खुली केल.

शिक्षण हे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक परिवर्तनाचे एक साधन आहे, याची सार्थ जाणीव ठेवून मी आज शिक्षकांचे प्रश्न घेऊन निवडणूक रिंगणात उभा आहे. शासन विनाअनुदानित शाळा व महाविद्यालयांना कोणत्याही प्रकारे अनुदान देत नाही, त्यामुळे त्यात काम करणाऱ्या शिक्षक वर्ग मोठ्या अन्यायाला तोंड द्यावे लागते.

वेतन आयोगाच्या निर्णयातही त्यांना लाभ मिळत नाही. समान काम समान वेतन मिळाले पाहिजे. एकाच शाळेत व कॉलेजात दोन तऱ्हेचे शिक्षक ही पद्धत बदलणे गरजेचे आहे. अशा विविध प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे बाळासाहेब गोतरणे यांनी सांगितले.

Leave a Reply